आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सोशल मीडियाची:पहिले लग्न लपवल्याने पतीवर बलात्काराचा अन् सासू-सासऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पहिले लग्न लपविल्याने त्याच्यावर बलात्काराचा, तर सासू-सासऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अकोला न्यायालयाने दिले. त्यानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्यात पती व सासू सासऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैत्री पडली महागात

सोशल मीडियाचा वापर हल्ली चांगल्या कामासाठी कमी आणि गुन्ह्यांसाठीच अधिक होऊ लागल्याची स्थिती आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला. एका तरुणीला सोशल मीडियावर मैत्री करणे चांगलाच महागात पडले. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 01 जानेवारी 2020 रोजी नाशिक येथील विनोद ढाकणे यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओखळ झाली. मैत्री झाल्यावर आमची जवळीक जास्त वाढली. संशयिताचे पहिले लग्न झालेले असताना, पहिली पत्नी हायात असून सुद्धा त्याने लग्न झाल्याचे लपवले. संशयित पतीच्या आई विजया व वडील वसंतराव ढाकणे यांनी घटस्फोट झाल्याचे नातेवाईकांना खोटे सांगत लग्न जमवले.

गुन्हा दाखल

लग्नाच्या काही दिवसांनी पतीचे लग्न झाले असल्याचे समजले. पहिल्या पत्नीची अधिकृत फारकत झालेली नसताना पतीने बळजबरीने लग्न करत शारीरिक संबध ठेवल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच पीडित विवाहितेने अकोला न्यायालयात तक्रार केली होती. अकोला न्यायालयाने मुंबईनाका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वे पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...