आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक:पहिले लग्न लपवून तरुणीशी केले दुसरे लग्न, नाशिकच्या पतीवर बलात्काराचा तर सासू-सासऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरील ओळख करणे अकोला येथील एका तरुणीला चांगलेच महागात पडले. पतीने पहिले लग्न झाल्याचे लपवत विश्वासघात करत बळजबरीने शारीरिक संबध ठेवल्याचा तर सासू-सासऱ्यांनी लग्न झाल्याचे लपवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने दिली. याबाबत अकोला न्यायालयाच्या आदेशाने पतीवर बलात्काराचा तर सासू-सासऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने ३० जानेवारी २०२० रोजी अकोला न्यायालयात पतीसह सासरच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२० रोजी नाशिक येथील विनोद ढाकणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधली. संशयिताचे पहिले लग्न झाले असताना व पहिली पत्नी हयात असताना त्याने ही बाब लपवली. संशयित पतीची आई विजया व वडील वसंतराव ढाकणे यांनी घटस्फोट झाल्याचे नातेवाइकांना खोटे सांगत लग्न जमवले.

लग्नाच्या काही दिवसांनी पतीचे लग्न झाल्याचे समजले. पहिल्या पत्नीची अधिकृत फारकत झालेली नसताना पतीने बळजबरीने लग्न करत शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच पीडित विवाहितेने अकोला न्यायालयात तक्रार केली होती. अकोला न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये पतीसह सासू-सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...