आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यातील पहिल्याच फिरत्या रुग्णालय प्रकल्पाचे उद्या हाेणार लाेकार्पण

नीलेश अमृतकर | नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील अतिदुर्गम खेड्यापाड्यांवर शासकीय रुग्णालय सेवा पुरेशी उपलब्ध नाही. त्यामुळे नसल्याने महिलांमधील कुपाेषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. ते राेखण्यासाठी श्री गुरुजी रूग्णालय संचलित सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून हैद्रराबादच्या कंपनीकडून सीएस आर निधीतून सुमारे २.५० काेटी रुपये खर्चून स्वास्थ रथ (फिरते रुग्णालय) पाड्यांवर फिरणार आहे. बुधवारपासून हा रथ रुग्णसेवेत दाखल लाेणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने नाशकातील श्री गुरुजी रूग्णालयाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, करंजाळी या भागातील खेड्यापाड्यांवर व दुर्गम भागात नियमित रुग्णसेवेसाठी उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, आता सेवा संकल्प समितीच्या प्रयत्नातून व केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या सहकार्याने आदिवासी खेडेपाड्यावर हा स्वास्थ रथ अर्थात फिरते रुग्णालय फिरवला जाणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक पॅथलाॅजी लॅब असून रक्त, लघवी, महिलांच्या आजारासंबंधीच्या विशेष तपासण्यासाठी यंत्रणा असणार आहे. दाेन तज्ज्ञ डाॅक्टर, नर्सेस, पॅथाॅलाॅजी तंत्रज्ञ, एक्स-रे मशीन, आैषधाेपचारसाठी स्वतंत्र फार्मासिस्ट व आैषध भांडार असणार आहे.

असे फिरणार रथ ग्रामीण भागात तालुकास्तरावर व माेठ्या लाेकसंख्येवरील गावांमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालये, आराेग्य केंद्र असले तरी पाड्यापाड्यांवर डाेंगर, टेकड्यांवर राहणाऱ्या आदिवसी बांधवांना उपचार मिळत नाही. बहुतांशी वेळा डाेंगरावरून खाली उतरत अथवा रुग्णालयांपर्यंत पाेहचेपर्यंत रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू हाेण्याच्या घटना घडत असतात. या अशा ठिकाणी हे फिरते रूग्णालय आठवड्यातून दाेन दिवस फिरणार आहे. तसेच, ज्या खेड्यानजिक आठ ते दहा पाडे आहेत, अशा ठिकाणी माेबाइल व्हॅन फिरून रुग्णांची नियमित तपासणी करेल. यासाठी दर महिन्याचे नियाेजन करण्यात येणार आहे. आठवड्यातून तीन दिवस चार-चार खेड्यांवर मुक्कामी राहून तपासण्या करण्यात येणार आहे. यामध्ये महिला वर्गावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यांच्या तपासण्यांचे जागेवरच निदान हाेणार असल्याने त्यांच्यावर उपचारही जागेवरच करण्याची साय आहे. सुरुवातीला पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात असे दाेन दिवस करंजाळी येथे अंबाेड (ता. सुरगाणा) गावात बुधवार व गुरूवार आणि उंबरठाण (ता. सुरगाणा) येथे शनिवार व रविवार मुक्काम असणार आहे. साधारणत: महिनाभरानंतर नियमित याच खेड्यांवर तपासणी करून पुन्हा तिसऱ्या महिन्यानंतर या गावी व्हॅन येईल. असे चारही आदिवसाी तालुक्यातील १००हून अधिक पाड्यांवरचे नियाेजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अमित डमाळे यांनी दिली.

माता-बालमृत्यू राेखण्यास प्राधान्य
या स्वास्थ रथात पूर्णपणे माेड्युलर आणि अत्याधुनिक यंत्रणा आहे. या रथाद्वारे बालमृत्यू व महिलांमधील कुपोषण राेखण्यासाठी आवश्यक तपासण्या व आैषधाेपचार अत्यल्प दरात करण्यात येणार आहे. त्याचा वाडी-वस्त्यांवरील नागरिकांना चांगला फायदा हाेणार आहे.
डाॅ. राजेंद्र खैरे, कार्यवाह, सेवा संकल्प समिती

बातम्या आणखी आहेत...