आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्पुरत्या स्वरूपात:नाशिक महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय आता बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये स्थलांतरित

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय आता पंडित कॉलनी ऐवजी बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये स्थलांतरित होणार आहे. त्यानंतर नवीन जागेचा शोध देखील घेण्यात येणार आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी मेनरोडवरील जुन्या नगरपालिका इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने सुरक्षिततेसाठी पूर्व विभागीय कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात पंडित कॉलनीत पश्चिम विभागीय कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. काही कामकाज मात्र जुन्या इमारतीत सुरू आहे.

नवीन जागेचा शोध

मुळातच महापालिकेची मेनरोडवरील इमारत ही ब्रिटिशकालीन आणि हेरिटेज म्हणून घोषित आहे. त्याचे संवर्धन चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य आहे. परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच द्वारका येथील भूखंड गेल्या बीओटीवर विकसित करण्याचा प्रयत्न होता. त्यात महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयासाठी जागा देण्यात येणार होती. मात्र, त्यात पुढे काहीच प्रगती झालेली नाही. गावठाण आणि इंदिरानगर भागातील पूर्व प्रभागाशी संलग्न नागरिकांना कधी मेनरोड, तर कधी पंडित कॉलनी असे कामासाठी जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यात आता पर्याय म्हणून महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी जीपीओसमोरील बी. डी. भालेकर हायस्कूलच्या जागेतून हे कार्यालय सुरू करण्याची सूचना केली आहे. तसेच लवकरच नवीन जागेचा शोधही घेण्यात येणार आहे.

नागरिकांच्या तक्रारी

पूर्व विभागाच्या प्रशासन, उद्यान आणि अतिक्रमण विभाग पंडीत कॉलनी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच, आरोग्य, जन्म-मृत्यू,विविध कर,पाणीपट्टी,घरपट्टी विभाग हा मेन रोडवरील जुनी इमारतीतच कायम आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय कार्यालय स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे काम होत नसल्याची तक्रार ही जात होती. पूर्व विभागात महापालिकेचे जुने प्रभाग क्रमांक 14,15, 16, 23 आणि 30 या प्रमागांचा समावेश असून या प्रभागातील नागरिक विविध अडीअडचणीसाठी मेन रोड येथील कार्यालयात येत होते. मात्र, विभागीय कार्यालय थेट पंडीत कॉलनीत स्थलांतर करण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता भालेकर शाळेत कार्यालय येणार असल्याने नागरिकांना होणारा त्रास थांबणार आहे.

बातम्या आणखी आहेत...