आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीवर कटरने प्राणघातक हल्ला:बोलणे बंद केल्याने प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल; नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वर्षापासून प्रेमसंबध असलेल्या प्रेयसीने काही दिवसांपासून बोलणे बंद केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार नाशिकरोड देवी चौक येथे घडला. तरुणीच्या तक्रारीनुसार संशयित प्रियकर शुभम अरुण घोलप (रा. जेलरोड) याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पंचक जेलरोड येथे वास्तव्याला आहे. नाशिकरोड देवी चौक येथील एका सराफ दुकानात नोकरी करते. सहा वर्षापासून संशयित शुभम सोबत प्रेमसंबध आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्रियसीने बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून संशयित तरुणी कामास असलेल्या अलंकार दुकानात आला. दुकानातच शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तरुणीने झटापट केली असता संशयिताने हातातील कटरने तरुणीच्या हातावर मारून जखमी केले. रक्तश्राव झाल्याने तीस तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळतात नाशिकरोड पोलिसांनी धाव घेतली. संशयिताचा शोध घेत त्याला परिसरात अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...