आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे 2021-2022 हे 'सुवर्णमहोत्सवी वर्ष' असून संस्थेचा वर्धापन दिन 24 डिसेंबर या दिवशी असतो. या वर्षी वर्धापनदिनाच्या औचीत्याने 21 ते 25 डिसेंबर दरम्यान पंचदिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्ताने नाशिक शहरात 'अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा, संलग्न संस्थांसह ब्राह्मण समाज एकत्र येणार आहे.
ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते हाेणार आहे. दररोज दहा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. 21,22 आणि 23 डिसेंबर या तीन दिवशी ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर त्यांची कीर्तने होणार असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, कार्यवाह सुभाष सबनीस, कोषाध्यक्ष अनिल देशपांडे आदी उपस्थित होते.
बाईक रॅली देखील निघणार
शनिवार, 24 डिसेंबर रोजी शहरातून बाईक रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमध्ये पारंपारिक वेशातील महिला, पुरुष सहभागी होणार असून रॅलीचे नेतृत्व जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी, करवीरपीठ हे करणार आहे.
कार्यकर्ता मेळावा व मान्यवरांचा सत्कार
रविवार 25 डिसेंबर रोजी संकेश्वर करवीर पीठाधिश्वर शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा व मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
हे आहेत पुरस्कारार्थी
अभिनेते – गिरीश ओक, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, सी.एल.कुलकर्णी, दीपक करंजीकर
पत्रकारिता – उदय निरगुडकर, सुशील कुलकर्णी
संगीत/गायन – अशोक पत्की, डॉ. मृदुला दाढे, डॉ.राम पंडित, मकरंद तुळणकर,
साहित्य/ग्रंथ – डॉ.मंजुषा कुलकर्णी, संतोष हुदलीकर, विलास शेळके, विनायक रानडे
उद्योग/व्यवसाय/शेती – रवींद्र प्रभुदेसाई, विलास शिंदे,सुनील धोपावकर, महेश वैद्य, प्रणव माजगावकर, देवेंद्र बापट
शैक्षणिक/सामाजिक – महेश दाबक, रतन लथ, प्रकाश कोल्हे,
वैदिक, अध्यात्मिक – अनिकेतशास्त्री देशपांडे, दिनेश वैद्य, धनंजय जोशी
प्रशासन – हर्षद आराधी, अनुश्री आराधी, विजय सूर्यवंशी, मुकुंद भट,
वैद्यकीय सेवा –डॉ.दिनकर केळकर, डॉ. अतुल वडगावकर, डॉ.विजयालक्ष्मी गणोरकर, आयुर्वेदाचार्य सुविनय दामले. डॉ. प्रसाद जोशी, डॉ. शामा कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे
समाजसेवा - श्रीकांत बागुल, गजानन देवचके, प्रशांत जुन्नरे, शेखर गायकवाड
अर्थशास्त्र - डॉ.विनायक गोविलकर, डॉ. आशुतोष रारावीकर
क्रीडा - विकास काकतकर, मकरंद ओक
ज्योतिष /शिल्पकला/अध्ययन - पं.विजय जकातदार, संदीप लोंढे, विद्याधर निरंतर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.