आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंथन:लाेककलावंतांचे मानधन, वर्गवारी अन‌् समानतेचे तत्त्व शासनाने पाळावे

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेककलावंतांचे रखडलेले मानधन तसेच वृद्ध कलावंत मानधन प्रस्तावासाठी उत्पनाची मर्यादा, कलावंतांतील आर्थिक विषमता व भेदभाव नष्ट करण्यासाठी वर्गवारी करताना शासनाने संविधानातील समानतेचे तत्त्व पाळावे त्यासाठी शासनाकडे तशी मागणी करण्यात येणार असल्याची चर्चा महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानाच्या बैठकीत करण्यात आली.

लोककलावंतांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी अभियानची बैठक हुतात्मा स्मारकात पार पडली. यावेळी प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण जाधव, उपाध्यक्ष विनायक पाठारे यांना अभिवादन करण्यात आले. बैठकीत राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच नाशिक, बीड, जालना, नगर व इतर जिल्ह्यांची कार्यकारिणी गठित करण्यात येणार असून त्यानंतर लोककलावंतांचे प्रलंबित प्रश्न शासनदरबारी मांडण्यात येतील असा निश्चय करण्यात आला. वेळप्रसंगी लढा उभारून कलावंतांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर व सरचिटणीस अशोक भालेराव यांनी दिली.

बैठकीत प्रलंबित मानधन प्रस्ताव, खोटे कलावंत छाननी, इतर जिल्हा कार्य संघटन व नाशिक जिल्हा कार्यकारिणी गठण, लोककलावंतांचे प्रश्न, शासकीय योजना यावर चर्चा झाली. नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. भरत कारिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून संपत खैरे यांची निवड करण्यात आली. प्रास्ताविक अनिल मनोहर यांनी तर सूत्रसंचालन अशोक भालेराव यांनी केले. मनोहर नेटावटे यांनी आभार मानले.

बैठकीतील ठराव असे... वृद्ध कलावंत मानधन प्रस्तावासाठी उत्पन्न मर्यादा ४८००० रुपयांवरून दीड लाख करावी. कलावंतांतील आर्थिक विषमता व भेदभाव नष्ट करण्यासाठी वर्गवारी (उदा. अ वर्ग, ब-वर्ग व क-वर्ग) पद्धत बंद करण्यात येऊन संविधानाच्या समानतेचे तत्त्व पाळण्यात यावे.दिवंगत मानधन प्राप्त मान्यवर वृद्ध कलावंताच्या पत्नीस वा वारसदारास प्रतिज्ञापत्र व मोजके कागदपत्रे घेऊन दोन महिन्यांच्या आत मानधन चालू करावे.

लोककलावंतांसाठी झटणाऱ्या नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थेचे दोन प्रतिनिधी, जि. प.च्या ‘मान्यवर वृद्ध कलावंत मानधन निवड समिती”वर, अशासकीय सदस्य म्हणून घ्यावेत.मानधन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो मंजूर की नामंजूर हे तीन ते सहा महिन्यांत कलावंताला लेखी कळविण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...