आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण:शासनाचा महात्मा बसवेश्वर सामाजिक समता सेवा पुरस्कार जाहीर; शुक्रवारी मुंबईत होणार वितरण

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सन 2016 पासून वीरशैव-लिंगायत समाजासह बहुजन समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘एक व्यक्ती व एक संस्थेला’ महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांच्या पुरस्कारार्थीचे पुरस्कार वितरण सोहळा 17 जून रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

शिवा संघटनेच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे शासनाच्या वतीने शासन निर्णय घेण्यात आला आहे. पुरस्कारार्थींचे नावे व संस्था- 2016-17 चा प्रथम पुरस्कार प्रा मनोहर धोंडे व संस्थेचा पुरस्कार शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेला जाहीर झाला आहे. 2017-18चा पुरस्कार अभय मनोहरराव कल्लावार, नागपुर यांना तर संस्थेचा पुरस्कार वीरमठ संस्थान राजुर, अहमदपूर यांना जाहीर झाला आहे. सन 2018-19 चा व्यक्ती म्हणून कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विठ्ठल बळीराम ताकबिडे यांना तर सन 2019-20 चा व्यक्ती म्हणून उमाकांत शेटे यांना जाहीर झाला आहे. संस्थेचा पुरस्कार महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस, 2020-21 चा व्यक्ती म्हणून रामलिंग बाबुराव तत्तापुरे, लातुर यांना जाहीर झाला आहे तर संस्थेचा पुरस्कार तिर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर जिल्हा सातारा यांना जाहीर झाला आहे. शासनाकडून 25 हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तर संस्थांना 51000 देऊन गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अशोक चव्हाण, सन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित रहणार आहेत. सदर कार्यकक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मनिष सुधाकर धाडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...