आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:महामानव डाॅ. आंबेडकरांना अभिवादन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी भीमगीतांचे आयाेजनही करण्यात आले हाेते. तर काही ठिकाणी शिबिरे, व्याख्याने पार पडली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या डॉ. आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि भीमाई महिला मंडळाच्या वतीने पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनील संपत कांबळे, अतुल भावसार, भीमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या शिरसाठ, कार्याध्यक्षा राजनंदिनी आहिरे, उपाध्यक्षा रोहिणी क्षीरसागर, शिला पाटील, सेक्रेटरी पूनम बैरागी, सल्लागार जयश्री बस्ते आदी उपस्थित होते. परिसरातील विविध भागांमधून भीमसैनिक, महिला अभिवादनकरण्यासाठी आले होते.

जनसुराज्य शक्ती पक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिटको महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष विलासराज गायकवाड, प्राचार्या मंजूषा कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.यावेळी हिरामण तेजाळे, मधुकर गिते, वामनराव भडदिवे, रमेश सरदार, राहुल रुपवते, जगन बर्वे, सुमित आहिरे, गिरीश कोरडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...