आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाह संस्था चालकाने हिंदु तरुणीचे मुस्लीम युवकासोबत लग्न लावून दिल्याच्या कारणातून संतप्त झालेल्या नातेवाईकांना आणि हिंदु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्था चालकाला बेदम चोप देत त्यांच्या तोंडाला काळे फासले. पंचवटी काळाराम मंदिर येथे हा प्रकार घडला. पुजाऱ्याच्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार
पोलिसांनी दिलेली माहीती आणि उमेश पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचवटी काळाराम मंदिर परिसरात वैदिक विवाह संस्था चालवतात. आठ दिवसांपुर्वी अंबड लिंक रोडवरील एका मुस्लीम तरुणाचे आणि आधरवड (ता. इगतपुरी) येथी एका हिंदु तरुणीचा विवाह वैदिक पद्धतीने लावला होता. दोघांना विवाहाचे प्रमाणपत्र दिले होते. सोशल मीडियावर हे प्रमाणपत्र व्हायरल झाले होते. याचा अधार घेत काही हिंदुत्ववादी संघटना आणि तरुणीच्या नातेवाईकांना संस्थेत येऊन जाब विचारला.
बेदम मारहाण
पुजारी यांनी संस्थेच्या माध्यमातून लग्न लावले जातात असे सांगीतल्यानंतर संतप्त जमावाने पुजारी यांनी बेदम मारहाण केली. काही तरुणांनी पुजारी यांच्या तोंडाला काळे फासले. घडलेल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. पुरोहित संघाच्या पाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर जमाव शांत झाला. संतप्त जमावाने पुजारी यांना धमकी दिली. पुजारी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरिक्षक डाॅ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कायदेशीर मार्गाने..
खासगी विवाह संस्थेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह लावले जात आहे. या जोडप्यांना प्रमाणपत्र दिले जात असल्याने याचा अधार घेत कायदेशीर मार्गाने तरुण आणि तरुणी पोलिसांत नातेवाईकांच्या विरोधात तक्रार करतात. याप्रकारातही असेच घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिंदू संघटना आक्रमक
अशा प्रकारे हिंदू आणि मुस्लीम तरुण तरुणींचे विवाह खासगी संस्थामध्ये लावले जात आहे. यास वैदिक विवाह संस्था खतपाणी घालत आहेत. अशाप्रकारे लग्न लावून देणाऱ्या संस्था चालकांच्या विरोधात आता तीव्र आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.