आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुवाद:‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’मधून उलगडतो भंडारदरा धरणाचा इतिहास ; विकास पवार यांचे मूळ मराठी पुस्तक

​​​​​​​नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारदरा धरण म्हटले की लगेच डोळ्यासमोर येतो अम्ब्रेला फॉल, उंच दरवाजांतून वेगाने बाहेर पडणारे पाणी, तसेच समुद्राप्रमाणेच नजर पोहोचेल तोपर्यंत पाणीच पाणी.. या धरणाची वाटचाल ही शतकपूर्तीकडे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजूर येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचलित आश्रमशाळेतील कर्मचारी विकास मुरलीधर पवार यांनी ‘सेंच्युरी ऑफ द लेक अर्थर हिल’ या पुस्तकातून धरणाच्या जागेच्या शोधापासून ते उद‌्घाटनापर्यंत इतिहास मांडला आहे. पवार यांनी हे पुस्तक मराठीतून लिहिले असून त्याचा इंग्रजीतून अनुवाद प्रा. शिवनाथ तक्ते यांनी केला आहे. त्यामुळे तो आता मराठीप्रमाणेच इंग्रजीतूनही वाचकांनादेखील उपलब्ध झाला आहे. त्याची प्रत लवकरच इंग्लंडमध्ये राजघराण्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण हे निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आले. पुस्तकात आदिवासी भागातील निसर्गसौंदर्यापासून ते धरण पूर्ण होईपर्यंतची छायाचित्रे असल्याने ते अधिक आकर्षक झाले आहे. धरण निर्मितीसाठी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ-२ यांनी मान्यता देताना त्यांच्या अभियंत्यांनी केलेल्या धरण बांधकामाचा १८ व्या शतकापासून ते १९२६ सालापर्यंतचा इतिहास सांगितला आहे. त्याकाळी पडणारा दुष्काळ, डेक्कन रॉयटर्स कमिशन, ब्रिटिशांनी परिसरात बांधलेले रस्ते, पूल यांचीही माहिती आहे. धरणामुळे लाभक्षेत्रात झालेले परिवर्तन एच. एच. बिल यांनी शोधलेली जागा, बांधकाम अभियंता अर्थर हिल यांनी केलेले काम, तेथे प्रथमच आलेला टेलिफोन, पोस्ट कार्यालय, बांधकामासाठी वापरली गेलेली त्या काळात आधुनिक मानली जाणारी यंत्रे यांसह विविध माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...