आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरेकरांचा सवाल:घोडेबाजार हाेणार असेल तर राऊतांचा त्यांच्याच सरकारच्या पाेलिस यंत्रणा, सीआयडी, गुप्तचर विभागावर विश्वास नाही का?

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी हाेणार असून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येणार आहेत. त्याआधीच संजय राऊत लक्ष वेधण्यासाठी नकाे ती बडबड करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज नाशिक येथे केला.

यंत्रणेने डोळ्याला पट्ट्या बांधल्या का?

राऊत यांच्याकडून घोडेबाजार हाेणार असल्याचे वक्तव्य हे भारतीय राज्य घटनेचा अवमान करणारे असून जर घोडेबाजार हाेणार असेल तर मग राऊत यांचा त्यांच्याच सरकारच्या पाेलिस यंत्रणा, सीआयडी, गुप्तचर विभागावर विश्वास नाही का? ते डाेळ्याला पट्टी बांधून बसले आहेत का? असा सवालही दरेकर यांनी केला.

कांदा परिषदेस उपस्थित राहण्यासाठी दरेकर नाशिक दाैऱ्यावर आले असताना रविवारी (ता. 5) पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी हाेणार आहेत. सेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक असणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशाेर जाेरगेवार यांनीच राऊत यांच्या घाेडेबाजार शब्दावर आक्षेप घेत तीन लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदाराचा भाव ठरवू नका, अन्यथा विचार करावा लागेल, यावरून बाेलताना भान राखावे, असा टाेलाही दरेकर यांनी लगावला.

कांदा उत्पादकांना मदत करा

दरेकर म्हणाले की, कांदा उत्पादकांना तातडीने प्रति क्विंटल ५०० रुपये मदतीची मागणी, कृषिमूल्य आयाेग बरखास्त करून राज्य सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, राज्य सरकारच्या नाकर्तेपणा व श्रेयवादामुळे केंद्राच्या जल जीवन मिशनच्या काेट्यवधींचा निधी परत गेला. आसाम, बिहार, तेलंगणा राज्याकडून 25 टक्क्यापेक्षा जास्त जल जीवन मिशन लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...