आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामायणाचे कार्य जगाला दिशा आणि दशा देऊ शकते. रामायण हा ग्रंथ नसून आमचा प्राण व संस्कार आहे, ते समजून घेतले तर जग सुखी होईल, असे प्रतिपादन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी केले.राजे संभाजी स्टेडियम येथे लोकनेता प्रतिष्ठान, स्वामी समर्थ मंडळ, शक्तिधाम यांच्या वतीने आयोजित रामकथेप्रसंगी ते भाविकांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या श्रीराम राज्याभिषेकाच्या जिवंत देखाव्यातून रामदर्शन घडविले. पुढे बोलताना समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले की, भावंडांचं प्रेम, भरत आणि श्रीराम यांची भेट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. भरताची मागणी रामाच्या चरणी “सत्ता नही सत्य चाहिए, पद नही पादुका चाहिए” हे वर्णन करताना त्यांचे जीवन किती वैराग्यपूर्ण होते है विशद केले. सीतामातेची मर्यादा सर्व स्त्रियांनी पाळली पाहिजे, असा संदेश दिला. रामकथा श्रवणासाठी माेठ्या यसंख्येने भाविक याठिकाणी उपस्थित हाते.
रामराज्याच्या जिवंत देखाव्यातून रामदर्शन
राम राज्याभिषेकाच्या जिवंत देखाव्याची भव्यता व दिव्यता पाहून साक्षात अयोद्धेत असल्याची अनुभूती भाविकांनी यावेळी घेतली.यां कार्यक्रमात शहरातील विविध मान्यवरांसह परिसरातील तसेच बाहेरगावहून आलेले हजारो भाविक याठिकाणी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.