आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:आई-वडिलांसह जखमी मुलीचा उपचारावेळी मृत्यू

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील उत्तमनगर येथील रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय शिरपूर येथे कानबाईचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना धुळ्याजवळ नरडाणा येथे ट्रॅक्टर व त्यांच्या कारच्या अपघात झाला. या अपघातात कारचालकासह चव्हाण दांपत्याचा मृत्यू झाला, त्यानंतर जखमी झालेल्या त्यांच्या ४ वर्षीय बालिकेचेही उपचारावेळी निधन झाले. चव्हाण दांपत्यासह बालिकेवर सिडकाेतील माेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

संदीप शिवाजी चव्हाण (४०) व त्यांची पत्नी मीना चव्हाण, मुलगी जान्हवी चव्हाण आणि कारचालक हितेश अरुण चौधरी (रा.म्हसरूळ) अशी मृतांची नावे आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मूळ रहिवासी व सध्या उत्तमनगर (नाशिक) येथे राहणारे चव्हाण कुटुंबीय तीन मुलांसह भाड्याची कार करून देव दर्शनासाठी गेले होते. पुन्हा नाशिकला परतत असताना साेमवारी (दि.१) रात्री उशिरा त्यांच्या कारचा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात तिघेजण जागीच ठार झाले. जान्हवीचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. मुलगा गणेश चव्हाण (६) व मुलगी साक्षी चव्हाण (१०) या जखमींवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...