आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वडाळा-पाथर्डी मार्गावरील अवजड वाहनांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गाने द्वारकाकडे येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात वाढले आहेत.ही वाहतूक त्वरित बंद करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी (दि. २०) अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पारधे यांनी याची तातडीने दखल घेत पोलिस प्रशासनाकडून ताे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

आमदार देवयानी फरांदे यांनी याची दखल घेत या रस्त्यावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याची मागणी केली होती.त्यामुळे सोमवारी (दि. १९) पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी या मार्गाची पाहणी केली. मंगळवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, रमिज पठाण, विश्वनाथ पवार, प्रकाश माळी, लक्ष्मण गोरे, सुनील राजपूत, मुकेश झनके, जयेश पिंपळीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, इंदिरानगरमधून पाथर्डी फाटा येथून अवजड वाहने अतिवेगाने मार्गक्रमण करत आहे. भरवस्तीतून ही वाहने जात असल्याने नागरिकांसाठी ते धाेक्याचे झाले आहे. त्यामुळे अवजड वाहतूक ही पूर्वीप्रमाणे द्वारकामार्गे उड्डाणपुलावरून वळवावी, नाशिकरोड ते द्वारकापर्यंत उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतुकीमुळे होणारा त्रास भविष्यात कमी होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...