आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा ताबा सुटून अपघात:सुरगणा येथे नवविवाहितेस माहेरी आणताना जीप उलटली; 2 ठार, 14 जखमी

प्रतिनिधी | बोरगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील वाघधोंड येथे ५ मे रोजी विवाह झालेल्या नवरीस शिंगळचोंड येथून पहिल्या मुळानंतर माहेरी आणत असताना वाघधोंड फाट्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पिकअप चालक राजू गांगुर्डे यांचा ताबा सुटल्याने उलटली. या अपघातात दोन जागीच ठार तर १४ जखमी झाले आहेत. यात नवरी वंदना दिनेश चौधरी हिस किरकोळ मार लागल्याने तिच्यासह इतर तीन जणांवर सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात हेमराज रमेश थविल (१२, रा. गारमाळ) व कमळीबाई सयाजी देशमुख (७०, रा. वाघधोंड) यांचे निधन झाले. याच अपघातात पिकअपमधील सुमन देशमुख (३२), लीलाबाई देशमुख (४५), पारीबाई देशमुख (५०), प्रल्हाद देशमुख (५०), पार्वती देशमुख (६५), रंगुबाई देशमुख (६५), यमुना जाधव (४०), प्रमिला भोये (४५), सीताबाई गावित (५०), शेवंताबाई गुंबाडे (५०), जानकाबाई जाधव (३२, सर्व रा. वाघधोंड, ता. सुरगाणा) हे जखमी झाले. डॉ. संजय चौधरी, डॉ. प्रतिक आरोटे, डॉ. योगिता जोपळे, डॉ. संजय चौधरी यांनी जखमींवर सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पिकअप (एमएच १५ एचएच ९७८७) दिंडोरी तालुक्यातील वारे येथील आहे. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पराग गोतुर्णे तपास करत आहे.