आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपिन बाफना खून खटला; पगारे, जटला फाशी:1 कोटीच्या खंडणीसाठी 9 वर्षांपूर्वी केले होते अपहरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बहुचर्चित बिपीन बाफना खून खटल्यात दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठवली. शुक्रवारी (दि. १६) जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकारी वकील फिर्यादीचे वकिलांनी आरोपींना फाशी व्हावी याकरता जोरदार युक्तीवाद केला. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी क्रुरता बघता फाशीच योग्य असून जन्मठेप दिली तर आरोपींची असे गुन्हे करण्याची हिम्मत वाढेल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ३५ साक्षीदार तपासले. विषेश म्हणजे एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

अोझर येथील व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा बिपीन बाफना डान्स क्लासला गेला असताना त्याचे १० जून २०१३ रोजी अपहरण करण्यात आले होते. पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिपिनच्या वडिलांकडे संशयितांनी १ कोटीची खंडणी मागीतली होती. खंडणी न दिल्यास मुलाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली होती. बाफना कुटुंबीयांनी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल केला. १४ जून रोजी आडगाव शिवारात बिपिनचा मृतदेह आढळून आला होता. संशयित चेतन पगारे (रा. अोझर),अमन जट (रा. केवडीबन पंचवटी), अक्षय उर्फ बाल्या सुळे (रा. नांदुर नाका), संजय पवार (रा. बागवाणपुरा ), पम्मी चौधरी यांना अटक केली होती. संशयितांवर अपहरण, खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिपीन बाफना खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना जो पर्यंत पकडले जात नाही तो पर्यंत मृतदेह घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अवघ्या एक तासामध्ये पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली हाेती. त्यानंतर सर्वांना कोर्टात उभे करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...