आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेल्फ कल्ब जॉगिंग ट्रॅक पाच दिवसांपासून अंधारात:मनपातील विद्युत, क्रीडा विभागाच्या असमन्वयाचा जाॅगर्सला फटका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत व्यायामप्रेमींसाठी महत्वाचे केंद्र बनलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील(गाेाल्फ क्लब) जाॅंगिग ट्रकवर सुमारे 12 काेटींचा खर्च करून नुतनीकरण करण्यात आले असले तरी केवळ मनपाच्या क्रीडा व विद्युत विभागातील असमन्वयाने हा ट्रॅकवरील पथदीपांचा 5 ते 6 दिवसांपासून वीजपुरवठा थकबाकीमुळे बंद करण्यात आला आहे. त्याचा फटका हजाराे जाॅगर्सला बसत असून मनपाच्या एकूणच कारभारावर व्यायामप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

गत काही दिवसांपासून गाेल्फ क्लबसारख्या जॉगिंग ट्रॅकला अवकळा आली आहे. विशेष म्हणजे, आमदार व मनपाच्या संयुक्त निधीतून सुमारे 12 काेटींचा नुतनीकरण करण्यात आलेले असताना ट्रॅकवर नियमीत पाणी न मारल्याने धूळ उडणे, झाडांना वेळेवर पाणी नसल्याने सुकण्याचे प्रकार होत आहे. त्यातच सर्वाधिक गर्दी असलेल्या याच ट्रॅकवर संध्याकाळनंतर पथदीप व इतबंद असल्याने शेकडाे महिला, पुरूषांना अंधाराच्या भितीने विना व्यायाम करताच घरी परतावे लागत आहे.

यांसदर्भात, अनेक जागरूक जाॅगर्सने ऑनलाईन मनपाच्या अॅपवर तक्रारीही केल्या तरीही त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येते. यातील काही जागॅर्सने माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे चाैकशी केली असता हा वीज पुरवठा थकबाकी न भरल्याने वीज वितरण कंपनीने खंडीत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दाेन लाखांच्या बीलापाेटीग ट्रॅक अंधारात

माजी नगरसेवक जाधव यांच्याशी संर्पक साधला असता त्यांना प्रशासनाकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम विभागाने अवघ्या दाेन लाख रुपयांचे बिल न भरल्याने वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. ब अखेरीस प्रशासक रमेश जाधव यांना यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तातडीने साेमवारी हे थकीत बील भरून वीज पुरवठा पुर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले.

समस्या कायम

जाॅर्गस विनय बिरारी म्हणाले, ट्रॅकवरील वीजपुरवठा खंडीत असल्याने रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या अनेक वृद‌्ध महिला अंदाज येत नसल्याने त्या चालताना पडून गेल्या. तर ट्रॅकवर कुत्रे झोपलेले असल्याने त्यांच्यावर पाय पडल्याने अथवा अचानक कुत्रे समाेर येवून नागरिकांच्या अंगावर सुटतात. तर शाैचालयांचीदेखील स्वच्छता हाेत नसल्यानेा परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

नगरसेवक प्रशांत जाधव म्हणाले की, वीज बिलाची किरकाेळ रक्कम भरण्यासाठी पैसे नसतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. मनपाचा अर्थसंकल्प दीड हजार काेटींच्या घरात असताना व्यायामप्रेमीं सुविधांकडे दुर्लक्ष करणे, अयाेग्य आहे.

साेमवारी वीजपुरवठा सुरळीत

शहर अभियंता नितीन वंजारी म्हणाले, मनपा क्रीडा विभागाने वीज देयक भरणे अपेक्षित असताना दीड ते दाेन लाखांची थकबाकी राहिल्याने वीज पुरवठा खंडीत झाला अाहे. साेमवारी बील भरल्यानंतर ट्रॅकचा वीजपुरवठा सुरळीत हाेईल.

बातम्या आणखी आहेत...