आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कामटवाडे स्मशानभूमीच मोजतेय शेवटची घटका ; तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यूनंतर माणसाचा ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. तीच स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याचा दुर्दैवी प्रकार कामटवाडे येथील स्मशानभूमीत दिसून येत आहे. येथील स्मशानभूमीची अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असताना महापालिकेला व एकाही लोकप्रतिनिधीला लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कामटवाडे गावाच्या समोरच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी लागणारा बेडच गेल्या काही महिन्यांपूर्वी तुटला आहे. याबाबत येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाला वारंवार तक्रार करूनदेखील अद्याप येथील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. यामुळे परिसरातील कुणाही नागरिकांच्या घरी दुःखद घटना घडल्यास त्यांना मोरवाडी किंवा दत्तमंदिर चौक येथील अमरधाममध्ये जावे लागते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या व लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...