आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपूर औद्योगिक वसाहत परिसरात शुक्रवारी (दि. १७) पहाटे बिबट्याचे दर्शन झाले. यश प्रिंटर्स या कारखान्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असला तरी रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. तीन दिवसांपासून बिबट्याचा शहरात मुक्काम असून त्याचा शोध घेण्यात वन विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे कामगारांसह स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभगाने रात्रपाळीत चार कर्मचारी तैनात केले आहेत.
दोन दिवसांपू्र्वी सिटी सेंटर मॉल परिसरात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाले होते. वन विभागाच्या पथकाने गुरुवारी व शुक्रवारी परिसरात बिबट्याचा शोध घेतला. शुक्रवारी सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसताच रहिवाशांनी वन विभागाला माहिती दिली. दरम्यान रात्री नागरिकांनी घराबाहेर एकटे पडू नये असे आवाहन पोलिस व वन विभागाने केले आहे.
दोन दिवसांत विविध ठिकाणी दर्शन सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटी, एबीबी सर्कल या भागात मध्यरात्री बिबट्या आढळला होता. त्यामुळे गुरुवारी दिवसभर वन विभागाच्या पथकाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला. येथील रहिवाशांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या. शुक्रवारी पहाटे सातपूर एमआयडीसीतील निलकमल, ज्योती सिरॅमिक, यश प्रिंटर्स, एक्स्लो कंपनीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. तेथेही बंद कारखान्यांसह परिसरात बिबट्याचा शोध घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.