आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पायात खिळे, तर कुणाची नखे उडाली’:आदिवासी शेतकऱ्यांचा लाँगमार्च सरकतोय पुढे

सचिन वाघ | नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाचे ढग दाटले असताना कशाचीही फिकीर न करता आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधील आदिवासी शेतकरी वज्रमूठ बांधून मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. मोर्चाच्या तिसऱ्या दिवशी कुणी अनवाणी असल्याने यात कुणाच्या पायात खिळे घुसले, तर कुणाच्या बोटांची नखे उडाली, तर कुणी उन्हाच्या तीव्रतेने रुग्णालयात दाखल झाले, परंतु, काहीही झाले तरी मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठणारच या आत्मविश्वासाने मोर्चा पुढे सरकतोय.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फे नाशिक येथून निघालेला मोर्चा सोमवारी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी येथे मुक्कामी होता. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता मुंबईकडे निघालेल्या काही मोर्चेकरी बांधवांना आरोग्याच्या समस्या उद‌्भवू लागल्या. अनेकांनी फडक्याने जखमेला बांधले. शरीरातील पाणी कमी झाल्याने शमीबाई लोहार चक्कर येऊन पडल्या, तरी पुन्हा सहभागी झाल्या.

...तर चेष्टा महागात पडेल
पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी मोर्चेकऱ्यांशी मंगळवारी दुपारी ३ वाजता बैठक ठेवली होती. परंतु ऐनवेळी बैठक रद्द केली. पुढील तारीख सांगितली नाही. आदिवासी शेतकरी बांधवांची चेष्टा कराल तर महागात पडेल, असा इशारा माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...