आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या ‘नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी’ या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन ९ मे रोजी सायंकाळी कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडले. ‘नृत्याली’ गेली २० वर्षे गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून नृत्यालीच्या नृत्यांगनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्यालीच्या छोट्या विद्यार्थिनीने गणेशवंदनेने केली. गोविंदनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी पदन्यासासह मनाला भावणारे ‘तू बुद्धी दे’ हे गीत सादर केले. भरतनाट्यममधील पारंपारिक रचना ‘अलारिपु’ नाशिकरोड शाखेच्या मुलींनी सादर केला. छोट्या मुलांच्या या रचनांनंतर पदार्पण नृत्यालीच्या मोठ्या कन्यांचे ‘सरस्वती गीतम्’, ‘नटेश कौतुकम्’, ‘तिल्लाना’ अशा एकामागोमाग एक भरतनाट्यमच्या पारंपरिक रचना सादर करत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’ हे गीत नृत्यातून सादर करत उपस्थितांची मने जिंकली. केतकी दांडेकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नृत्यालीच्या ५० विद्यार्थिनी एकाचवेळी रंगमंचावर दोन वर्षांच्या अवधीनंतर सादरीकरणासाठी आल्या. गानसम्राज्ञी स्वर्गीय लतादिदींच्या स्मरणाप्रीत्यर्थ नृत्यरूपी आदरांजली म्हणून काही रचना सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.