आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिष:कर्जाचे आमिष; सरकारी कर्मचाऱ्यास 2 लाखांचा गंडा

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आॅनलाइन कर्ज घेणे एका शासकीय कर्मचाऱ्याला महागात पडले. सायबर हॅकरने रिझर्व्ह बँकेची बनावट नोटीस पाठवत एका वित्त कंपनीचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष देत विविध क्युरी असल्याचे सांगत एक लाख ९३ हजारांना आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार महाराष्ट्र पोलिस अकादमीत उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र साळवे (रा. एमपीए) यांच्या तक्रारीनुसार, मे महिन्यात अनोळखी नंबरहून फोन आला. टाटा कॅपिटल लि., मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे, स्टॅम्पपेपर आणि कर्ज मंजुरीचे अॅग्रीमेंट आणि रिझर्व्ह बँकेचे नाव असलेली डिजिटल नोटीस पाठवत कर्ज मंजूर करण्याचे आमिष दिले. कर्ज मंजूर करण्यासाठी जीवन विमा पाॅलिसी काढावी लागले, अॅग्रीमेंट सुरक्षेसाठी ६ टक्के रक्कम, आरटीजी चार्ज, सर्व्हिस चार्ज, जीएसटी भरावा लागेल असे सांगत बँक खात्यात आॅनलाईन पैसे भरण्यास सांगीतले. रिझर्व्ह बँकेने तुमचे मेमोरंडम बँक खाते ब्लाॅक केले आहे. ते अनब्लाॅक करण्यासाठी लाॅक खात्यात ५० टक्के रक्कम भरावी लागले असे सांगत साळवे यांना १ लाख ९३ हजार आॅनलाइन भरण्यास सांगत फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाेलिसांत साळवे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...