आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दुबईवारीचे आमिष ; डाॅक्टरला ५ लाखांचा गंडा, फार्मा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याकडून डाॅक्टरांना लक्ष्य करत फसवणूक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फार्मा कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत एकाने नाशिकच्या डाॅक्टरला दुबई येथे काॅन्फरन्ससाठी पाठवण्याचे आमिष देत या डाॅक्टरकडून वेळोवेळी ५ लाख ८१ हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयित विशाल पांड्ये (रा. प. बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि डाॅ. काळे यांच्या तक्रारीनुसार, डाॅ. काळे हे कार्डियाेलाॅजिस्ट आहेत. द्वारका परिसरात त्यांचे हाॅस्पिटल आहे. त्यांना अनोळखी नंबरहून काॅल आला.

फ्लाइट व हाॅटेल बुकिंगसाठी वेळाेवेळी घेतले पैसे
फ्लाईट बुकिंग, हाॅटेल बुकिंग आणि विसा याकरिता पैशांची मागणी करत १० वेळा त्याच्या खात्यात आॅनलाइन पैसे पाठवले. संशयिताने डाॅक्टरांना पैसे रिफंड करण्यासाठी त्याच्या खात्याचा चेक दिला. चेक क्लिअर होण्यास तीन दिवस लागत असल्याने या कालावधीत संशयिताने डाॅक्टरला पैसे भरण्यास भाग पाडत फसवणूक केली.

डाॅक्टरांनी सतर्क व्हावे
अशाप्रकारे अनोळखी नंबरवरून काॅल आल्यास सतर्क व्हा. केवळ कार्डियाक डाॅक्टरांना हा संशयित लक्ष्य करत आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी लखनाैत गुन्हा दाखल झालेला आहे.
डाॅ. काळे

संशयित सराईत
संशयित फार्मा कंपनीत कामाला होता. त्याने देशातील अनेक डाॅक्टरांना गंडा घातला आहे. कंपनीने त्याला काढून टाकले आहे. डाॅक्टरांनी खबरदारी घ्यावी.
सूरज बिजली वरिष्ठ निरीक्षक, सायबर सेल

बातम्या आणखी आहेत...