आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:कपडा व्यवसायाचे आमिष, 35 लाखांना गंडा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपड्याच्या व्यवसाय सुरू करण्यास सांगत या व्यवसायात मोठा फायदा करून देण्याचे आश्वासन देत तब्बल ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित सुनीता मनोज माहेश्वरी आणि मनोज प्रकाश माहेश्वरी या दाम्पत्याच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रकाश सहाणे यांच्या तक्रारीनुसार, सहाणेंचे येवलेकर मळा येथे दुकान आहे. २०१८ ते २०२० या काळात दोघा संशयितांनी ऑफिसमध्ये येऊन कापड व्यवसायाची माहिती दिली. खरेदी-विक्रीचे बारकावे सांगत वेळोवेळी ३५ लाखांची रक्कम घेत अपहार केला, अशी तक्रार सहाणे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिली. वरिष्ठ निरीक्षक रिजाय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय भिसे तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...