आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:माजी महापौरांच्या पत्नीचे मंगळसूत्र खेचले

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी महापाैर यतिन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ या लंडन पॅलेस येथे लग्नासाठी गेल्या असता परतताना तेथील पार्किंगमध्ये त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चाेरी गेल्याची घटना घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अणि जितेश यतिन वाघ (रा. महाकवी कालिदास कलामंदिरजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नवीन आडगावनाका येथील लंडन पॅलेस येथे कारने लग्नसोहळ्यास त्या गेल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून मुलासह पार्किंगमध्ये कारमध्ये बसत असताना पायी आलेल्या एक अनोळखी तरुणाने हितेश यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाचे मंगळसूत्र अणि सोन्याची साखळी खेचून पाेबारा केला.

वाघ आरडाअोरड करत संशयितांच्या मागे धावल्या, मात्र सर्व्हिसराेडवर त्याच्या साथीदारासह चाेर दुचाकीसह द्वारका चौकाच्या दिशेने पळून गेले. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...