आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:झटापट करत महिलेचे मंगळसूत्र लांबवले

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मखमलाबादरोडवर सोनसाखळी चोरांनी चक्क दुचाकीवरून उतरत महिलेशी झटापट करत तिच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. मातोश्रीनगर, मखमलाबादरोडवर हा प्रकार घडला. याबाबत म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अलका पाटील (रा. विद्यानगर, मखमलाबादरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाटील आणि त्यांची बहीण भाजी बाजारातून भाजीपाला घेऊन घरी पायी जात असताना मातोश्रीनगर रोडवर काळ्या दुचाकीवर दोन इसम येताना दिसले. त्यापैकी एकजण १० फूट अंतरावर उतरून चालत आला. अचानक गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. झटापट केली असता बळजबरीने गळ्यातील मंगळसूत्र खेचले. तोपर्यंत दुचाकीचालक जवळ आला त्याच्या गाडीवर बसून संशयित दोघे नाशिकच्या दिशेने पळून गेले. वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...