आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाल रंगाच्या ‘वाय’ अक्षरात, ग्लोव्हज घातलेल्या हातात एक वैद्यकीय शस्त्र असलेले पोस्टर काही दिवसांपूर्वी झळकले होते. या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच हातात मशाल घेऊन लढतानाचा आक्रमक रूपातील मुक्ता बर्वेचा एक फोटो समोर आला होता. त्यामुळे हे काय आहे, असा प्रश्न विचारला जात होता. आता ते पोस्टर दुसरे तिसरे काही नसून 24 जूनला प्रदर्शित होणाऱ्या वाय चित्रपटाचे असल्याचे अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि टीमने स्पष्ट केले.
संघर्षाची कहाणी
सरकारी यंत्रणेतील काही धक्कादायक गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांनी नाशिककरांशी मंगळवारी संवाद साधला. झोपेतून उठणाऱ्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना येतो आणि नंतर एकेक गोष्टी समोर येत असतानाच सिनेसृष्टीतील कलावंतांनी, राजकारण्यांनी, काही नामवंतांनी ‘वाय’ अक्षर असलेले पोस्टर हातात धरून उत्सुकता वाढवली होती. हळूहळू चित्रपटातील कलाकारही समोर येऊ लागले आणि आता काळजाचा ठोका चुकवणारा ‘वाय’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित असल्याचे यावेळी कलाकारांनी व्यक्त केले. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मन हेलावून टाकणारा हा चित्रपट आहे.
शुक्रवारीच घडतात घटना
मुक्ता बर्वे म्हणाली की मी एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध यात दिसणार आहेत. यात यश मिळणार की हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.