आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड-करंजवण या ३०५ कोटी रुपये खर्चाच्या योजनेसाठी नगरपालिकेला एक रुपयाही भरावा लागणार नाही. ही योजना १८ महिन्यांत पूर्ण होईल. त्याच्या टेंडरची वर्कऑर्डर १-२ दिवसांतच ईगल कंपनीला दिली जाणार असून १५ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, असे प्रतिपादन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केले.
या योजनेसाठी लोकवर्गणीपोटी भरावी लागणार पूर्ण रक्कम अमृत योजनेत असल्याने व मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यासाठी हमी घेतल्याने ही रक्कम पालिकेला भरावी लागणार नाही. १९ टक्के अबोव्ह रकमेचे टेंडर आले असले तरी याबाबत कंत्राटदाराशी चर्चा झाली असून कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेवर या योजनेचा कोणताही बोजा पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.