आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर दस्तक अभियान:कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस न घेतलेल्या 23 टक्के नागरिकांचा पालिका घेणार शोध

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात कोरोनाचे सात रुग्ण आढळले. ही बाब लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी शहरात लसीकरणचा वेग वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्याचे आदेश दिले आहे. या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत ज्यांनी पहीला व दुसरा डोस घेतलेला नाही, अशा अनुक्रमे 4 टक्के व 23 टक्के नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

शहरात 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या 13 लाख 63 हजार 700 लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 96 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही 77 टक्के आहे. त्यामुळे 23 टक्के नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. तर 15 ते 18 वयोगटातील 90 हजार 300 युवकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 69 टक्के युवकांनी पहिला तर, 44 टक्के युवकांनी दुसरा डोस घेतलेला आहे.

त्यामुळे अद्याप 31 युवकांनी पहिला तर,56 टक्के युवकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. 14 वर्षाखालील किशोर वयीन गटातील 58 हजार 450 मुलांपैकी 72 टक्के मुलांनी पहिला तर 34 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरण न केलेल्या या सर्वांचा शोध घेवून त्यांनी लसीकरण केंद्रापर्यत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

त्यासाठी सहा विभागात सातशे पथकांची स्थापना केली जाणार आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचवणार आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी लसीकरण न झालेल्यांची संख्या अधिक असेल त्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश पवार यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...