आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Name Of Ganeshaetsva, But The Appearance Of Herdings Disfigures The Village; Defacement By Hoardings Around Main Roads, Chaikakacha| Marathi News

हाेर्डिंग्जची आरास:गणेशाेत्सवाचे नाव, पण हाेर्डिंग्जचे देखावे विद्रुप करताहेत गाव; मुख्य रस्ते, चाैकाचाैकात हाेर्डिंग्जद्वारे विद्रुपीकरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गणेशाेत्सवाच्या निमित्ताने आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे माेठे माेठे हाेर्डिंग्ज लावून मुख्य रस्त्यांवर, वाहतूक बेट व चाैकाचाैकात विद्रुपीकरण करण्यात आले आहे. हे अनाधिकृत हाेर्डिंग्जमुळेे बहूतांशी ठिकाणी वाहतूकीला अडथळे ठरत असताना महापालिका आणि पाेलिस यंत्रणेकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे.

विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने अनाधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्याचे व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे महापालिकेला आदेश दिलेले असतानाही पालिकेकडून पावलाेपावली न्यायालयाचा अवमान केला जात आहे. त्याचप्रमाणे माजी आयुक्त दीपक पांडेय यांनी शहर हाेर्डिंग्जमुक्तीसाठी स्वतंत्र परिपत्रक काढून शिक्षेची तरतूद करणारी नियमावली जाहीर केलेली असतानादेखील त्यांच्याच खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे.

इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन : शहरात गणेेशाेत्सवानिमित्त भाविकांना शुभेच्छा देण्यसाठी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी गणेश मंडळापासून दूर अंतरावर मुख्य रस्ते, चाैकाचाैकात, बसस्टाॅपवर, पुतळ्यांच्या बाजूला, वाहतूक बेटांवर त्या-त्या राजकीय नेत्यांसह स्वत:ची छबी झळकविण्यासाठी माेठमाेठे अनधिकृत हाेर्डिंग्ज लावले आहेत. याच हाेर्डिंग्जद्वारे पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी व त्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वत:ची छबीही त्यावर दिमाखात झळकवली आहे. यामध्ये काहींनी तर आरक्षण निश्चित नसल्याने स्वत:सह पत्नीचे तर काहींनी तर आई-वडिलांचेही फलक लावून या विद्रुपीकरणात भरच घातली आहे. याकडे मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

चाैक, पुतळे, बसथांब्याना विळखा
पाथर्डी फाटा चाैकात महापुरुषांच्या पुतळ्यांवरच वाढदिवसांचे फलक लावले आहेत. त्याच बाजूला थेट उड्डाणपुलावरच फलक, स्वागत कमानी लावून त्यावर राजकीय मंडळीचे छायाचित्र लावण्यात आले. तर सिटी सेंटर माॅल चाैकापासून ते उंटवाडी पुलावर, त्रिमूर्ती चाैक, पवननगर, उत्तमनगर, अंबड लिंकराेड, राणेनगर, गाेविंदनगर बाेगद्याच्या दाेन्ही बाजूस, मुंबईनाका, इंदिरानगर, लेखानगर चाैकाचाैकात हाेर्डिंग्ज उभारून बाजार भरला आहे. सिडकाे, सातपूरसह शहरात सर्वत्र हीच स्थिती आहे.

पांडेय यांच्या आदेशाचा विसर
तत्कालीन पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी २० सप्टेंबर २०२१ राेजी शहर हाेर्डिंग्जमुक्तीसाठी मुबंई पाेलिस अधिनियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत स्वतंत्र परिपत्रक काढले. कुठलेही समारंभ, वाढदिवस, स्वागत असो की धार्मिक, दशक्रिया विधी, व्यावसयिक जाहिरातींना पाेलिस व मनपाची परवानगी आवश्यक. अवैध हाेर्डिंग्ज दिसताच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. याचा मात्र पाेलिस यंत्रणेला विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्याची जबाबदारी आमची नाही तर महापालिकेचीच
शहरातील अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. या संदर्भात पालिकेने पाेलिस बंदाेबस्त मागितला तर तशी व्यवस्था आम्ही नेहमीच करताे. तत्कालीन आयुक्त दीपक पांडेय यांच्या हाेर्डिंग्जबाबतचा आदेश कायम आहेत ताे रद्द केलेले नाहंीत. याबाबत तक्रारी आल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.
जयंत नाईकनवरे, पाेलिस आयुक्त, नाशिक शहर

बातम्या आणखी आहेत...