आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष!:विद्यार्थ्यांनी स्वता:चा गुरु स्वता: होणे काळाची गरज; माजी न्यायाधीश अनिल वैद्यांचे प्रतिपादन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या युगात विविध माध्यमांचा व तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा निश्चितच समाजासाठी फायदेशीर आहे, मात्र अशा माध्यमांचा व तंत्रज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांनी आपला स्वतः मध्येच गुरू निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत सेवानिवृत्त न्यायाधीश श्री अनिल वैद्य यांनी व्यक्त केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात नशिक शहरातील सर्व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्या वतीने सोमवारी (05 सप्टेंबर) कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.

स्वता:चा गुरु स्वता: होणे काळाची गरज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आलेल्या विविध गुरुजनांविषयी यावेळी श्री वैद्य यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती करून देत डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये स्वतःचा गुरु निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगुन डॉ,बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, या महापुरषाच्या जिवनातील गुरुचे महत्व किती मोलाचे होते याबाबत शेवटी बोलतांना स्प्ष्ट केले.

यावेळी शासकिय वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार श्री वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आजच्या दिनाचे औचित्य साधत समाज कल्याण विभागात देखील प्रथमच शिक्षणाचे महत्वाचे कार्य करणा-या निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व शासकीय वसतिगृहांचे गृहपाल यांचा शिक्षक दिनी सन्मान आला. त्यात मुख्याध्यापक श्री रामनाथ होंडे (येवला), व श्रीमती शोभा काबळे (जामखेड), गृहपाल श्री तुकाराम खांडगे (संगमनेर), श्री.बाळु बडे (शेवगाव),तर शिक्षक संवर्गात श्रीमती दिपाली भुजबळ (येवला),श्रीमती दिपाली तडवी (पिपळगाव),श्री धुर्वास राठोड (चाळीसगाव),श्रीमती विद्या पारोदे (श्रीगोंदा),श्री.सुभाष शितोळे (कर्जत) यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी अॅंड.भारत बुकाणे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर, सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, श्रीमती हर्षदा बडगुजर, समाज कल्याण अधिकारी, गृहपाल श्रीमती शुभांगी भालेराव, श्रीमती सरिता रेड्डी, मंगला येलमामे, यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थिती होते.शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनी कु.धम्म गौतमी,व कु. पल्लवी गुजरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी देखील शिक्षक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून तर काहींनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले. तर सन्मानार्थी कर्मचारी यांनी देखील आजच्या दिनाच्या औचित साधत विभागाने प्रथमच अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून सन्मान केल्याबद्दल विभागाचे धन्यवाद व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...