आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजगार उपलब्ध करून देणे हे आज मितीस सर्वात मोठे काम आहे. खासदार गोडसे यांनी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित केलेला खासदार रोजगार मिळावा हा स्तुत्य आणि अतुलनीय उपक्रम असून प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले . दरम्यान आजच्या खासदार रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या 1274 बेरोजगार तरुणांना कार्यक्रमातच थेट नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.
औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्सवर आयोजित केलेल्या खासदार रोजगार मेळाव्यात बोलताना ना.सामंत यांनी वरील प्रतिपादन केले.यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे,खा.हेमंत गोडसे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखरपाटील,सौ भक्ती गोडसे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,शहरप्रमुख प्रविण तिदमे, महंत सुधीरदास पुजारी, महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई ताठे , डिस्टीलचे किरण रहाणे, निपमचे बारी आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्हाला हेवेदावे आणि राजकारणात रस नसल्याने आमच्याकडून सततच लोकाभिमुख कार्य आणि विकासकामे सुरूच आहे.याबरोबरच समाजातील कुटुंबविकास होणे महत्त्वाचे आहे.तरुणांना रोजगार मिळाला तर आर्थिक प्रगती होऊन त्यांच्या कुटुंबाचा विकास होईल या सकारात्मक विचारातून आजच्या रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी खा.गोडसे यांनी दिली.
राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये शासनाने या योजनेसाठी केवळ 170 कोटी रुपये खर्च केले. तर सत्तातंर झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी 500 कोटी रुपयांचे अनुदान दिले असून विद्यमान सरकार धोरण बेरोजगारीचे उच्चाटन करणे असल्याचे स्पष्ट्र करत तरूणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट्र केले.
खासदार गोडसे यांनी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित केलेला खासदार रोजगार मिळावा हा उपक्रम अभिनंदनीय असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने तरूणांच्या चेहऱ्यावर आंनद ओसांडून वाहत होता. मेळाव्यात 3800 जणांनी सहभाग घेतला होता. 988 जणांना शॉर्टलिस्ट केले असून लवकरच त्यांना दुसऱ्या फेरीसाठी बोलविण्यात येणार आहे.सुमारे पंधराशे जणांना कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती आयोजक भक्ती गोडसे यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.