आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालयाच्या (आयटीआय)वतीने महाराष्ट्रभर सुरू असलेल्या प्रवेशाची पहिली फेरी समाप्त झाली. पहिल्याच फेरीत तब्बल 40 हजार 710 म्हणजे 44.18 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. गेल्यावर्षी पेक्षा तब्बल 10 हजारांनी अन् 15 टक्क्यांनी ही संख्या वाढली आहे. यात नाशिक विभागात 46.52 टक्के प्रवेश झाले असून 87 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला आहे. राज्यात मुंबई विभागात सर्वाधिक 52.75 टक्के प्रवेश झाले आहेत.
सरकारी संस्थांचा आहे समावेश
गेल्याकाही वर्षांपासून व्यवसाय व प्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्याची प्रतिमा आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियातून दिसून येत आहे. संपूर्ण राज्यभर आयटीआयसाठी प्रवेशाची एकत्रित, राज्यस्तरीय प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात खासगी आणि सरकारी दोन्ही संस्थांचा समावेश आहे. राज्यात आयटीआयच्या विविध कोर्सेसच्या मिळून तब्बल 1 लाख 49 हजार जागा आहेत. त्यापैकी 40 हजार 710 जागा या प्रथम फेरीतच भरल्या आहे. म्हणजे एकूण प्रवेशाच्या 67.86 टक्के जागा या प्रवेशासासाठी विद्यार्थ्यांना सुचवण्यात (ऑफर) आल्यापैकी 40 हजार 710 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
राज्यात नाशिक विभाग तिसरा
विभाग - आयटीआय संख्या - एकूण जागा - प्रवेश टक्के
मुंबई - 106, 20164, 6537,52.75
नागपूर - 238, 28356, 6914, 48.53
नाशिक - 215, 29764, 8165, 46.52
अमरावती - 90, 18500, 5475, 37.90
औरंगाबाद - 135, 20820, 5099, 34.06
पुणे - 191, 31688, 5820, 45.97
एकूण 975, 49, 292, 40,710, 44.18
दुप्पट अर्ज
महाराष्ट्रात आयटीआयच्या 1 लाख 49 हाजर 292 जागा आहे. त्यासाठी यंदा तब्बल 3 लाख 8 हजार 439 म्हणजे दुप्पट अर्ज आले आहे.
इलेक्ट्रीशनला अधिक पसंती
नाशिक आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशन, मोटर व्हेकल मेकॅनिक आणि वायरमेन या तीन कोर्सला विद्यार्थ्यांकडून अधिक प्राधान्य देण्यात आले. पहिल्याच फेरीत 48 पैकी 30 जागा भरल्या. मोटर मेकॅनिकच्या 38 पैकी 33 तर वायरमेनच्या 48 पैकी 24 जागांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आयटीआयची राज्यस्तरी प्रथम फेरीची प्रक्रीया संपली. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान दूसरी फेरी पूर्ण होईल. यंदा आयएमसीचे 26 प्रवेश नाशिकमध्ये झाले असून एकूण 259 जागा आहेत. शासनाने प्रथमच ही सुविधा उपलब्ध केली असून ज्यांना पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही अशांना यातून प्रवेश दिले जातील. - राजेश मानकर, प्राचार्य सातपूर आयटीआय
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.