आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोलिस मदतीसाठी ‘100’चा भार आता ‘112’ क्रमांकावर; एमडीटी प्रणालीने तक्रारदारांना मिळणार तत्काळ मदत, शहरात ५० पोलिस वाहनांवर यंत्रणा तैनात

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्ह्याची माहिती अथवा संकटात सापडलेल्या नागरिकांना आता ११२ नंबरवर २४ तास तत्काळ मदत मिळत आहे. पोलिस मदत मिळण्यासाठी १०० नंबरवर नागरिक कॉल करत होते मात्र आता या नंबरवर येणारे सर्व कॉल ११२ नंबरवर वळवण्यात येत असून तक्रारदाराला अवघ्या १० ते १५ मिनिटांत पोलिसांची मदत मिळत आहे.

महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम यंत्रणेंतर्गत पोलिस, रुग्णसेवा आणि आगसंदर्भात मदत पुरवली जाते. शहर पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीसाठी २० चारचाकी वाहने आणि ३० दुचाकींना एमडीटी (मोबाइल डेटा टर्मिनल) यंत्रणा लावण्यात आली आहे.

पोलिस मदत घेण्यासाठी प्रारंभीपासून १०० नंबरवर कॉल केला जात होता. पूर्वी मॅन्युअल सिस्टिममुळे मदत मिळण्यास विलंब होत होता. यासाठी महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम कार्यन्वित केली आहे. आता ११२ नंबरवर कॉल केल्यास पोलिस, आरोग्य व आग या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते.

बातम्या आणखी आहेत...