आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये आत्महत्या:जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने राहत्या घरी घेतला गळफास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयाच्या परिचारीकेने घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. गुरुवारी (ता. 2) तारवालानगर, दिंडोरीरोड येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शितल अरविंद सरोदे (38, रा. गोकुळ सोसायटी, तारवालानगर, दिंडोरी रोड) यांनी राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या भावाच्या हा प्रकार लक्षात आला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

सरोदे या सिव्हिलमध्ये अतिदशक्षता विभागात कार्यरत होत्या. मागील वर्षी त्यांची मालेगाव येथे बदली झाली होती. मात्र त्या हजर झाल्या नव्हत्या. बदलीसाठी त्या प्रयत्नशिल होत्या. बदली न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा सिव्हील हाॅस्पिटलमध्ये आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी परिचारिकांनी रुग्णालयात धाव घेतली. अतिशय मनमिळाऊ व कामात तत्पर असलेल्या परिचारीकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...