आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणुकीचा विजयोत्सव:ढोल ताशाच्या गजरात भाजप शहर कार्यालय बाहेर पदाधिकाऱ्यांनी धरला ठेका, भरवले पेढेही

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत तीन जागेवर विजय मिळवला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या या विजयाचे शनिवारी (ता. 11) शहरातील वसंत स्मृती या शहर भाजप कार्यालयात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

एकमेकांना भरवले पेढे

ढोल ताशाच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरत आनंद साजरा केला भारतीय जनता पार्टीचा विजय असो देवेंद्र फडवणीस जिंदाबाद अशा या वेळी घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण केली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या या विजयाचे भाजपच्या या विजयाचे पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करण्यात आले.

विधान परिषदेसाठी तयारी

पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत हा विजय साजरा केला यावेळी पक्ष कार्यालयाच्या बाहेर फटाके देखील फोडण्यात आले. राज्यसभा पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत देखील भाजप मोठा विजयाने जिंकेल असा विश्‍वास यावेळी भाजप पदाधिकार्‍यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर विजय उत्सवाच्या माध्यमातून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होतायावेळी भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी , आमदार सीमा हिरे,शहराध्यक्ष गिरीश पालवे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे सुजाता करंजीकर आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...