आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षामध्ये विसरलेली वृद्ध महिला प्रवाशाची पिशवी रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली. प्रामाणिकपणाबद्दल रिक्षा चालकाचे परिसरात कौतुक होत आहे. पिशवीत बंॅकेतून काढलेले २० हजार रुपये राेख व महत्त्वाचे कागदपत्रे हाेती. श्रीमती मंदाकिनी मुरलीधर इंगोले या रथचक्र चौक येथून रिक्षा क्रमांक एम.ए.के.१५ ईएच २०३७ यात बसून माजी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या कार्यालयाजवळ उतरल्या.त्यावेळी त्या त्यांची पैशांची व कागदपत्रांची पिशवी रिक्षामध्ये विसरल्या. पिशवीत बँकेतून काढलेले पेन्शनचे २० हजार रुपये व मौल्यवान वस्तू तसेच बँकेची कागदपत्रे होती.
त्या महिला प्रवासी रिक्षात पिशवी विसरल्याचे रिक्षाचालक राजेंद्र कापुरे (रा. पांडवनगरी) यांच्या लक्षात आले. त्यांनी या महिलेची शोधाशोध केली. परंतु त्या मिळून आल्या नाही. त्यामुळे त्यांनी जवळच असलेले श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत टक्के यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पिशवीतील कापुरे या महिलेचे रोख रुपये बँक पासबुक व इतर कागदपत्रांवरून त्यांचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. सदर रिक्षाचालक राजेंद्र कापुरे यांनी फेस बुक वरून नावाची शोधाशोध माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी करून त्यांच्या मुलाचा नंबर मिळवून यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व मुदेमाल त्याच्या ताब्यात दिला. या री रिक्षा चालकाच्या प्रामाणिक वर्तणुकीमुळे सर्व स्तरातून रिक्षाचालक राजेंद्र कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.