आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:रुग्णाची परिचारिकेस मारहाण;‎ रुग्णसेवा दोन तास ठप्प‎

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत‎ असलेल्या महिला रुग्णाला मंगळवारी‎ रात्री उशिरा भेटण्यासाठी आलेल्या‎ नातेवाइकांना कक्षाबाहेर जाण्यास‎ सांगितल्याचा राग आल्याने उपचारार्थी‎ महिलेने थेट महिला परिचारीकेस मारहाण‎ केली. या घटनेनंतर बुधवारी (दि. १)‎ सकाळी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी काम‎ बंद आंदाेलन पुकारले.

यामुळे दाेन तास‎ रुग्णसेवा ठप्प हाेती. मात्र जिल्हा‎ शल्यचिकित्सकांनी परिचारिका संघटनेशी‎ चर्चा करत प्रत्येक मजल्यावर सुरक्षारक्षक‎ नियुक्तीचे आश्वसान दिल्यानंतर आंदाेलन‎ मागे घेण्यात आले.‎ यातील तक्रारीनुसार, महिला रुग्ण‎ कक्षात स्वच्छता करण्यासाठी रुग्णांच्या‎ नातलगांना कक्षाबाहेर जाण्याची सूचना‎ परिचारिकेने केली. तिथे उपचार घेणाऱ्या‎ प्रिया गवई यांचे पती कक्षाबाहेर गेल्याने‎ त्यांनी संतप्त हाेत परिचारिका जाधव व‎ मावशी मीना चौधरी यांना शिवीगाळ करीत‎ मारहाण केली. यात दोघांनाही दुखापत‎ झाल्याने त्यांना आपात्कालीन विभागात‎ दाखल करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...