आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:छायाचित्र नॅशनल हायवेचेच आहे, गुजरातकडे जाताना पेठराेडवर मरणयातना

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बातमीतील छायाचित्र हे प्रातिनिधिक आहे. पेठराेडवरील राऊ हाॅटेल साेडले तर पुढे शहर संपेपर्यंत, रामशेज, आशेवाडीच्या पुढे जाईपर्यंत हा रस्ता मरणयातना देताे. नाशिकहून गुजरातला जाेडणारा हा नॅशनल हायवे ८४८ असूनही त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्षच आहे. आता तर या खड्ड्यांत रस्त्याचा शाेध घ्यावा लागताे आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावरून वाहने गेली की प्रचंड धूळ उडते. परिसरातील घराघरांत धूळच धूळ असते. झाडांवर, पार्क केलेल्या वाहनांवर, दुकानांमध्ये सर्वत्र धूळच धूळ आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांचे त्रास तर हाेतच आहेत, पण येथील नागरिकांना आता श्वसनाच्या त्रासानेही घेरले. या सर्व परिस्थितीचा हा ग्राउंड रिपाेर्ट...

दिवसाच नाही तर रात्रभर माेठ्या संख्येने अवजड वाहनांची वर्दळ, घर-दुकानांत येणाऱ्या धुळीमुळे दिवसातून वारंवार करावी लागणारी सफाई, हवेत उडणाऱ्या धुळीमुळे स्कूल बससाठी रस्त्याच्या कडेला उभी राहणारी त्रासलेली मुले आणि पालक व येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाकडून वाहिली जाणारी शिव्यांची लाखाेली अशी भीषण अवस्था गुजरातमधून नाशिकमध्ये प्रवेश करण्यासाठीच्या पेठराेडची सध्या आहे. जीवघेणा प्रवास आणि परिसरात राहण्याची शिक्षाच जणू या भागातील रहिवासी भाेगत असून त्यांची सहनशीलता संपल्याने ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

रस्त्याच्या अवस्थेने घराघरात धुळीचे थर साचतात, श्वसनाला त्रास हाेत आहे. रस्त्याच्या कडेला दहा मिनिटेही तुम्ही उभे राहू शकत नाही. याकरिता आता नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत.- साेमनाथ पिंगळे, नागरिक

रहिवासी आक्रमक
लाेकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही तर आता नागरिकच आक्रमक झाले आहेेत. त्यामुळे राऊ हाॅटेल ते तवली फाट्यापर्यंतचे काम तातडीने सुरू करावे.- भगवान शेटे, रहिवासी

अपघात नित्याचेच
खड्ड्यांमुळे अनेकदा दुचाकीवरून महिला पडल्या आहेत. छाेटे-माेठे अपघात नित्याचेच झाले आहेत. किमान रुग्णांचा, गर्भवतींचा तरी विचार करा.- जगदीश चाैधरी, नागरिक

बातम्या आणखी आहेत...