आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता:कवीने कविता कुणाला समजावी; अस्वस्थतेचा हुंकार हाच कवितेचा आत्मा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवीने कविता कुणाला समजावी म्हणून लिहू नये. त्याने त्याच्या आत्मिक समाधानासाठी कविता लिहावी. कवितेतून अस्वस्थतेचा हुंकार बाहेर पडला पाहिजे. कवितेची मांडणी नेहमी अंतकरणातून झाली पाहिजे. समाजातील अस्वस्थता आपल्या आजूबाजूचे प्रश्न यावर भाष्य करणारी, तितक्याच प्रखरतेने प्रकाश टाकणारी कविता नेहमी रसिक प्रेक्षकांना भावत असते. अस्वस्थता हाच कवितेचा आत्मा असतो आणि तो अंतकरणातूनच येत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.

ग्रंथाली प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात रविवारी (दि.५) स्वयंभू काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे बोलत होते. याप्रसंगी कवी आशुतोष पोतदार, ग्रंथाली प्रकाशनाचे प्रवीण शिंदे उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे म्हणाले की, कवीने अंतःकरणातील घुसमट तिथून बाहेर पडावे.

कवितेची रचना ही अंतकरणातूनच व्हायला हवी. अशा कवितेचा प्रवास स्वयंभू असतो. कवी भारंबे यांनी केवळ भारतीय साहित्याचाच नव्हे तर पाश्चात्त्य साहित्याचाही अभ्यास केल्याचेही पठारे म्हणाले. कवी नाटककार आशुतोष पोतदार यांनी काव्य संग्रहावर प्रकाश टाकला. स्वरचनेचे प्राथमिक सूत्र कविताच असते, असेही पोतदार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...