आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:केवायसी अपडेटचा बहाणा;‎ डाॅक्टरचे चार लाख लंपास‎

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवायसी अपडेट‎ करण्याच्या बहाण्याने शहरातील एक‎ प्रतिष्ठित डॉक्टरांना पाठवलेल्या‎ मेसेजमधील लिंकवर डाॅक्टरने क्लिक‎ केल्याने त्यांच्या खात्यातून तब्बल ३‎ लाख ९९ हजारांची राेकड लंपास‎ झाली आहे. डाॅक्टरांच्या तक्रारीनुसार‎ सायबर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎

यासंदर्भात डॉ. सृष्टी विक्रांत विजन‎ (रा. कॉलेजरोड) यांनी सायबर‎ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे‎ सासरे डॉ. विनोद विजन यांना १ ते २‎ मार्चदरम्यान बँक खात्याचे केवायसी‎ अपडेट करण्याचा मेसेज आला. त्यांनी‎ त्यावर क्लिक केल्यानंतर बँक‎ खात्यावरून चार व्यवहारांद्वारे ३ लाख‎ ९९ हजार ९८४ रुपये इतर खात्यात वर्ग‎ केले. हे करत असताना डॉ. विजन‎ यांना कोणताही ओटीपी आला नव्हता.‎

बातम्या आणखी आहेत...