आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Problem Of Agricultural Irrigation And Drinking Water In Many Villages Will Be Solved; Waki Khapri 600, Bham 300 And Bhavli 190 Cusec Rotation | Nashik Marathi News

नियोजन:अनेक गावांतील शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार; वाकी खापरी 600, भाम 300 व भावलीतून 190 क्यूसेकने आवर्तन

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरीतून ६००, भाममधून ३०० तर भावली धरणातून १९० क्यूसेकने बुधवार (दि. १६) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. या तिन्ही धरणातून सोडलेले आवर्तन दारणा धरणात साठणार दारणातून २५० क्यूसेकने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात विसर्ग केला जात आहे. या आवर्तनामुळे इगतपुरी तालुक्यातील २० ते २५ गावांना फायदा होणार असून शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वरिष्ठांच्या पुढील आदेशापर्यंत या तिन्ही धरणातून विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती शाखा अभियंता सुरेश जाचक यांनी दिली आहे.

वाकी खापरी धरणाची क्षमता १.८० टीएमसी असून त्यात सध्या ८५ टक्के पाणीसाठा आहे. भाम धरणाची क्षमता २.४ टीएमसी असून त्यात ६५.२२, भावली धरणाची क्षमता १४ टीएमसी असून त्यात ४३.१० टक्के साठा आहे. या धरणांमधून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. उन्हाच्या तीव्रतेने विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड होऊ बसले होते. परिणामी पिके करपू लागली होती. मात्र, या आवर्तनामुळे विहिरींच्या पाणी पातळीत सुधारणा होणार असून शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे.

आवर्तनामुळे रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांच्या लागवडी यामध्ये भुईमूग व अन्य पिकांसह उन्हाळी सोयाबीन फायदा होणार आहे. सोडण्यात आलेले पाणी दारणा नदीतून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात येत आहे. हे पाणी डावाल उजवा कालव्याच्या माध्यमातून कोपरगाव, वैजापूर, निफाड, येवला, राहाता व श्रीरामपूर या तालुक्यातील शेतीसाठी जाते. या परिसरातून पाण्याची मागणी आल्यास ते सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...