आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेखकाला सांभाळणारी व्यवस्था, वाचक, प्रकाशन संस्था, साहित्यिक केंद्रे नष्ट झाल्याने प्रगतिशील लेखणाची प्रक्रिया मंदावली आहे. लेखनाची प्रक्रिया दिवसेंदिवस अत्यंत जोखमीची आणि गंभीर बनत चालल्याने अभिव्यक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा वेळेस प्रगतिशील घटकांची मोट बांधणी ही काळाची गरज आहे व तसा गतिरोध निर्माण होणे उत्क्रांतीच्या दृष्टीने देखील आवश्यक आहे, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक प्रा. जी. के. ऐनापुरे यांनी नाशिकच्या प्रगतिशील लेखक संघाच्या मेळाव्याप्रसंगी केले.
रोटरी क्लब, नाशिक येथे झालेल्या प्रगतिशील लेखकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नाशिकचे दिवंगत लेखक बाबुराव बागुल यांच्या अप्रकाशित कथा 'सूर्याचे सांगाती ' या नावाने ऐनापुरे यांनी प्रकाशात आणल्या. त्यांच्या या वाङ्मयीन योगदानाबद्दल नाशिककरांच्या वतीने त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर लोकवाङ्मयग्रहाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो, दलित पॅंथरचे नेते अर्जुन डांगळे, करुणासागर पगारे त्याचबरोबर संमेलनाध्यक्ष संजय दोबाडे, स्वागत अध्यक्ष डॉ. समीर अहिरे, डॉ. अमोल देवळीकर आदी मान्यवर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतिशील लेखक संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रमोद अहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रल्हाद पवार यांनी केले. उपस्थितांमध्ये प्रा. शंकर बोऱ्हाडे, कवी राजू देसले, लता कांबळे, प्राध्यापक गंगाधर अहिरे, प्रगतिशील लेखक संघाचे राज्यसचिव राकेश वानखेडे त्याचप्रमाणे कवी संतोष कांबळे, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाचे प्रतिनिधी, इंडियन पीपल्स थेटर नाशिकचे प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबुराव बागुल यांनी शरदचंद्र मुक्तीबोध यांना लिहिलेले पत्र त्यांनी यावेळेस वाचून दाखवले आणि प्रगतिशील लेखकांची व्यवस्थेमध्ये होणारी हेळसांड यावर मार्मिक असे भाष्य केले. आपल्या विवेचनामध्ये त्यांनी विचारी, अविचारी, आणि समविचारी असे वर्गीकरण करून कोण कोणाच्या बाजूने सांस्कृतिक युद्ध लढतो आहे? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. कृतीप्रवण आणि विचारप्रवण करणाऱ्या साहित्याच्या मार्गातील अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय अडथळे यांच्या विषयी सविस्तर विवेचन त्यांनी आपल्या बीजभाषणामध्ये केलं.
या संमेलनामध्ये बीज भाषणासोबतच डॉ. कानगो यांनी दलित पँथरची पन्नास वर्ष या महत्त्वाच्या विषयावर विवेचन केले. छत्रपती शाहू महाराजांच्या शताब्दी वर्षाचे निमित्त साधून माणगाव परिसराची शंभर वर्ष यावर देखील जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यान यावेळी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.