आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक एज्युकेशन सोसायटीच्या १०० वर्षांच्या यशस्वी वाटचालीत शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षकांच्या भरीव योगदानामुळेच संस्थेची प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयाच्या प्रांगणात आजी-माजी संस्था अध्यक्ष, कार्यवाह, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बाेलत हाेते. संस्थेमध्ये सांस्कृतिक प्रवाह सुरू असल्याने उत्तम कलाकार निर्माण झाले आहेत याचा अभिमान वाटतो. नवीन शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेच्या गौरवशाली परंपरेत भर घातली असल्याचे रहाळकर यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, रमेश देशमुख, कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य चंद्रशेखर वाड, विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, पांडुरंग अकोलकर, मोहन रानडे, ॲड. जयदीप वैशंपायन, सचिन महाजन, राजा वर्टी, सुरेश राका, मुख्याध्यापक कैलास पाटील उपस्थित होते. संस्थेचा नावलाैकिक परदेशातही असून तेथेे संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी नावलाैकिक मिळवित असल्याचे मान्यवरांनी सांगितले. संस्थेसाठी माजी विद्यार्थ्यांचे देखील याेगदान लाभत असते. त्यातून विद्यार्थ्यांसाठी विविध संकल्पना अमलात अाणते, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दाेन लाख रुपये कृतज्ञता निधी संस्थेसाठी
डी. एम. कुलकर्णी, रूपचंद पाटील, के. डी. चौधरी, रंजना परदेशी, एल. एस. जाधव, रा. गो. हिरे, बा. झी. भडके, रत्नाकर बकरे, शीतल बोरसे, शोभा बहादे, शीला बेलदार, चंद्रकांत भालेराव, प्र. ल. सोनी यांनी सुमारे सव्वा दोन लाख रुपये कृतज्ञता निधी संस्थेला सुपूर्द केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.