आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला ठार:पाऊस आला, वीज गेली; नाशिक अंधारात ; संसरीला वीज कोसळून महिला ठार, दोन वृक्ष कोसळले

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरासह परिसराला गुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. पाऊस येताच शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळून पडले तर वीज अंगावर कोसळल्याने संसरीला महिला ठार झाली. गुरुवारी दुपारनंतर शहरासह परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले. यानंतर सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू झाला. देवळाली कॅम्पला जोरदार पाऊस पडल्याने शहरात पाणीच पाणी साचले असून शहरातील मुख्य रस्त्यावर एक झाड उन्मळून पडले तर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लेव्हिट मार्केटमध्ये पाणी शिरल्याने नागरिक पाण्यातून मार्गक्रमण करत असल्याने आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे यांनी कर्मचाऱ्यांच्या साह्याने मार्केटमधील साचलेले पाणी बाहेर काढले. तसेच विजयनगर येथील आहुजा कॉम्प्लेक्ससमोरील भागात पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या तीन दिवसांपासून वातावरण अतिशय तप्त बनले होते. गुरुवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व विजेच्या कडकडाटाने परिसरातील वातावरण बदलून गेले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने सायंकाळी सहाला सर्वत्र अंधार दाटून आला. शहरातील अनेक जुनी झाडे धोकादायक बनली असून या गुरुवारी झालेल्या वादळात दोन झाडे कोसळली. यात जीवितहानी झाली नाही. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले असून लॅमरोडवर सुरू असलेल्या कामामुळे ठिकठिकाणी खोदून ठेवलेले असल्याने त्यात पाणी साचून वाहनधारकांना अंदाज न आल्यास अपघात होण्याची दाट श्यक्यता आहे. वीज पडून महिला ठार देवळाली कॅम्प | संसरीला वीज पडून सविता बाळासाहेब गोडसे (४५) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी जनावरांना चारा घेऊन मळ्यातून घरी परतताना या महिलेच्या अंगावर वीज पडली. यावेळी त्यांचे पाठीमागे काही अंतरावर असलेली मुलगी यातून बचावली. नागरिकांनी सदर महिलेस कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...