आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत उपचारा:तरुणांची तत्परता ठरली चिमुकल्याचा ‘प्राणवायू’ ; बाळाला रेल्वेत पुरविला ऑक्सिजन

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिमुकल्याच्या ताेंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क पाहून अनेकांचा जीव कळवळत हाेता. उपचारासाठी त्या चिमुकल्याला मुंबईकडे नेत असतानाच त्याचा ऑक्सिजन संपला. मात्र नाशिकच्या तरुणांना ही माहिती कळताच त्यांनी तत्परतेने रेल्वेमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आणि तेच या चिमुकल्यासाठी प्राणवायू ठरले.

कोलकात्याहून मुंबईला उपचारासाठी पालक १३ महिन्यांच्या बाळाला घेऊन जात हाेते. त्याला ऑक्सिजन लावला हाेता. मात्र ताे संपल्याची वेळ आली हाेती. रात्री रेल्वे प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता हाेत नव्हती. नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळेत ऑक्सिजन सिलिंडर पुरवत माणुसकीचे दर्शन घडविले. गुरुवारी (दि. ३) मध्यरात्रीची ही घटना. कोलकाता येथील एका १३ महिन्यांच्या बाळाला मुंबईला उपचारासाठी रेल्वेने नेले जात होते. रेल्वे ७ तास उशिरा धावत असल्याने ऑक्सिजन संपल्याने चिमुकल्याच्या जीवावर बेतण्याची स्थिती निर्माण झाली हाेती. त्याचवेळी सेवाग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या भूषण जैन यांनी मनमाड स्थानकावरून सामाजिक कार्यकर्ते दीपक डोखे यांच्याशी संपर्क साधत वस्तुस्थिती सांगितली. डोखे यांनी तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला. सिलिंडरच्या बदल्यात सिलिंडर देण्याची तयारी दाखवत ऑक्सिजनची मागणी केली. डॉ. थोरात यांनी लगेचच सोय केली. रेल्वे मनमाडहून नाशिकरोडला येईपर्यंत सिलिंडरची सोय करून ते रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. शिवा गायधनी यांनी रुग्णवाहिका पुरवत वेळेत सिलिंडर पोहोचवण्याचे गणित जुळविले.

एकाचवेळी नाशिक जिल्हा रुग्णालय आणि दुसरीकडे नाशिकरोड अशा दोन्ही भागात यंत्रणा कार्यरत झाली. रेल्वे मनमाडहून नाशिकला येताच त्याच्यापर्यंत तरुणांनी सिलिंडर पाेहाेचवले. तरुणांच्या या तत्परतेने चिमुकल्याला वेळेत ऑक्सिजन मिळाला. परिणामी, शुक्रवारी सकाळी मुंबई वाडिया रुग्णालयात संबंधित बाळावर उपचार करणे शक्य झाले. १३ महिन्यांच्या बाळावर गळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला नेण्यात येत हाेते. नाशिकच्या या तरुणांच्या प्रयत्नामुळे चिमुरड्यावर वेळेत उपचार शक्य झाल्याचे रेल्वेतील सहप्रवासी डॉ. हितेश बुऱ्हाडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...