आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय खाद्यतेल महासंघाची माहिती:पामतेलापाठोपाठ सोयाबिन तेलाच्या दरातही होणार घट; आंतरराष्ट्रीय बाजारपेढेतील स्थितीचे कारण

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबिन तेलाच्या भावात २ ते ३ रुपयांची वाढ नोंदवली गेली होती, परंतु आठवड्याच्या अखेरीपर्यंत परदेशी बाजारातील घसरणीमुळे भाव घसरले आणि स्थिर झाले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात सोयाबिन तेलाच्या साठ्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे इंडोनेशियाने पामोलिनची निर्यात वाढवण्यासाठी निर्यात करात कपात केली असून जास्तीत जास्त निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, याचमुळे पामतेलापाठोपाठ सोयाबिन तेलाचे दरही कमी होणार असे संकेत मिळू लागले आहेत.

भारतीय खाद्यतेल महासंघाचे राष्ट्रीय शंकर ठक्कर यांनी याला दुजोरा दिला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, 27 मे ते 15 जून दरम्यान अर्जेंटिनाच्या सोयाबीन तेलाच्या किमती 120 डॉलर प्रती टन इतक्या घसरल्या आहेत. आयातदार देशांकडून मागणी कमकुवत झाल्यामुळे. 27 मे ते 15 जून दरम्यान मुंबई बंदरात सोयाबीन तेलाची किंमत 4_5 रुपये प्रती किलोने घसरून 1480 डॉलर प्रती टन वर पोहोचली. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वनस्पतींनी २ ते ३ रुपये किलोने वाढ केल्यानंतर किंमत कमी केली. गेल्या आठवड्यात मुंबई बंदरात सोया तेलाचा भाव मोठ्या प्रमाणावर घसरला होता. तेल दरवाढीनंतर घेतलेल्या निर्णयाबाबत भारत सरकारचा कठोरपणा आणि परदेशी बाजारातील अस्थिरता पाहता दीर्घ तेजीची आशा नगण्य आहे.

कांडला बंदरात येऊ घातलेय १ लाख टन पामतेल

या आठवड्याच्या सुरुवातीला भावात घसरण झाली. उच्च घसरण झाली. उच्च किंमतींवर कमकुवत मागणी आणि परदेशातील बाजारातील कमजोरी यामुळे खाद्यतेलाची घसरण सुरूच आहे. इंडोनेशियातून निर्यात सुरू झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत पामतेलाचा पुरवठा सामान्य झाला आहे. 1 लाख टनांहून अधिक पामतेल लवकरच कांडला बंदरात येऊ घातले आहे.त्यामुळे या तेलाचे देखील अजून घसरण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...