आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Rickshaw Pullers' Brotherhood In Ambad, The Citizens Took To The Streets; Shouts Of Police Neglect Despite Frequent Complaints | Nashik Marathi News

होळीच्या दिवशीच आंदोलन:अंबडमध्ये रिक्षाचालकांची भाईगिरी, नागरिकांनी रस्त्यावरच मांडला ठिय्या ; अनेकदा तक्रारी देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याची ओरड

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड परिसरातील चुंचाळे, दत्तनगर भागातील रिक्षाचालकांनी स्थानिक दुकानांची तोडफोड करीत व्यावसायिकांना मारहाण केली. या घटनेविरोधात परिसरातील नागरिकांनी गुरुवारी (दि.१७)थेट रस्त्यावर उतरत पोलिसांच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवत आंदोलन केले. अंबड पोलिसांकडे रिक्षाचालकांच्या गुंडगिरीविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने महिला, मुलांसह ठिय्या आंदोलन केले.

दत्तनगर भागात व्यावसायिक रिक्षाचालकांची मुजोरी व गुंडगिरी वाढल्याने संतप्त नागरिकांसह परिसरातील दुकानदार, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी ऐन होळीच्या दिवशी लाक्षणिक बंद पुकारला. वाढत्या गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी धरणे आंदोलन केले. वाहतूक शाखेला तसेच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांना निवेदन देऊन तक्रारी मांडल्या. पोलिसांनी आठवडाभरात गुंडांवर ठोस कारवाई न केल्यास अंबड पोलिस ठाण्यावर व पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा साहेबराव दातीर यांनी दिला. यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे, भागवत आरोटे, अविनाश शिंदे, रामदास दातीर आदींच्या नेतृत्वाखाली गणेश दातीर, परमेश्वर खांङबहाले, विनायक मोरे, समाधान शिंदे, नारायण राऊत, देवा जाधव, सतीष आरोटे, नितीन दातीर, विजय शिंदे, नवनाथ शिंदे, अमोल मुंगले, लताबाई गायधनी, नितीन दातीर यांच्यासह नागरिकांनी आंदोलन केले. मुजोर रिक्षाचालक तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांना वठणीवर आणले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

अवैध धंदे हेच मुख्य कारण
दत्तनगर, कारगिल चौक परिसरात रिक्षा चालकांची मुजोरी वाढली असून दररोज भांडणे, दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करण्याबरोबरच दुकानांची तोडफोड तसेच भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान करण्याचे प्रकार घडत आहेत. परिसरात वाढलेले अवैध धंदे हेच रोजच्या भांडण-तंट्याचे मूळ कारण आहे. पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या अवैध व्यवसायांना पायबंद घालावा. वाहतूक पोलिसांनी देखील मद्याच्या नशेत रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांचा निष्काळजीपणा उघड
पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर व सहायक निरीक्षक बागड यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांशी चर्चा केली. अनधिकृत रिक्षा थांबे व मुजोरी करणारे रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र याचवेळी संतप्त नागरिकांनी यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...