आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स रस्त्यावरील अतिक्रमण काढणार ; विकासकामाला विलंब होत असल्याचा आरोप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अतिशय रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यापूर्वी काम होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र काही बड्या व्यक्तींचे अतिक्रमण मनपाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून न हटविल्याने या विकासकामाला विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने ४ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करताच मनपा आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी करीत अतिक्रमण हटवून काम सुरू करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...